dr.satish best web design developer for mac

शिप्पूर ग्रामपंचायत :

शिप्पूर तर्फ नेसरी / हेळेवाडी हे कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील एक सुंदर गाव  आहे. गावाला लागूनच पुढे एक छोटीशी वस्ती आहे, ते हेळेवाडी हे गाव. पण हे गावदेखील शिप्पूर मध्येच येत असल्यामुळे व नेसरी शिप्पूरपासून अगदी काहीच अंतरावर असल्यामुळे या गावाला शिप्पूर तर्फ नेसरी / हेळेवाडी असे म्हणतात. गावचे वैशिष्‍ट म्‍हणजे गावाला लाभलेला निसर्ग, लोकांचे राहणीमान व उच्‍च शैक्षणीक स्‍तर अशी अनेक वैशिष्‍टे आहेत. गावातील उच्‍च शिक्षणामुळे गावातील प्रगतीचा दर वाढत चालला आहे. तसेच गावातील ग्रामपंचायतीने गावात विविध सुविधा आणल्यामुळे गाव स्वच्छ व सुंदर दिसते.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

शिप्पूर तर्फ नेसरी / हेळेवाडी ग्रामपंचायत ही 1957 सालापासून  कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 338 असून गावाची लोकसंख्या 1402 इतकी आहे.एकूण घरांची संख्या 456 असून ती 3 वॅार्ड मध्ये  विभागली गेली आहे.

सरपंच
सौ. राजश्री शिवराज गुरबे

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. अनिल कृष्णा शिखरे

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. संदीप अदमापुरे

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Shippur Grampanchayat
A/p Shippur Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416504

CONTACTS
Phone :9075533192

Office : 02327 – 200132